मुंबई: करोनाबाधीत, करोना सदृष्य आणि करोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी रुग्णालयांची विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. करोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या प्रमाणानुसार रेडआरेंज आणि ग्रीन झोन तयार केले जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्राचे दिशानिर्देश उद्यापर्यंत येतील त्यानंतर हे झोन तयार केले जातील. असेही आरोग्यमत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात लाकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी किमान या शब्दावर जोर दिला आहे. त्यामुळे लोकांनी यापुढेही नियम आणि शिस्त पाळली नाही तर ३० एप्रिलनंतरही लांक डाऊन वाढ वावे लागणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ___ करोनावरील उपचारांत सुसूत्रता येण्यासाठी आता तीन प्रकारची रुग्णालये असतील. कोविड केअर सेंटर अंतर्गत रुग्णालयांत करोनाची लक्षणे नसलेले रुग्ण असतील, कोविड हेल्थ सेंटर अंतर्गत रुग्णालयांत करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होतील आणि कोविड रुग्णालयांत करोनाची तीव्र लक्षणे असलेल्या तसेच करोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार होतील, असे टोपे यांनी सांगितले. सेव्हन हिल्ससारख्या मोठ्या रुग्णालयांत तिन्ही प्रकारच्या रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
...तर महाराष्ट्रात ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊनः टोपे