कल्याण : चालू शालेय सत्रात शाळाबाह्य निराधार मुलांचा शोध घेऊन शाळेत प्रवेश देणाऱ्या सम्राट अशोक विद्यालयाने निराधार विद्यार्थी पालकांना मदतीचा हात देत या पालकांना अन्नधान्य दिले आहे. सरकारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी या सत्राच्या प्रारंभी विजयनगर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला होता.
शाळेचाही मदतीचा हात