डोंबिवली (फारुख ) : डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात तांबडा पाऊस, हिरवा पाऊस हे विषय कालबाह्य झाले. तरीही इथे नेहमीच केमिकल फॅक्ट-यांचे अतिशय अस्वस्थ करणारे घाणेरले वास येत असतात. प्रदूषण काही संपता संपेना, असे झाले आहे. मात्रा, डॉ. भालचंद्र कवी यांच्या पत्नी अपर्णा कवी यांनी सोशल मिडीयाच्या पाटावर डोंबिवलीचे प्रदूषण मांडून झोपलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवलीचा क्रमांक देशात चौदावा तर राज्यात दुसरा लागतो. वास्तविक एमआडीसीतील अनेक कारखाने बंद पडूनही डोंबिवलीतील प्रदूषण वाढतच चालले आहे. त्यासाठी येथील विविध घटक कारणीभूत आहेत. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या अखत्यारित येणात्या केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि आयआयटी दिल्ली यांनी अलिकडेच देशभरातील औद्यागिक वसाहतींमधील प्रदूषणाचा अभ्यास केला. __ या अभ्यासानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी जाहीर केलेला अहवाल इतका धक्कादायक आहे की त्यामुळे डोंबिवलीकरांची साफ झोप उडाली असेल. देशातील सर्वाधिक प्रदूषित औद्योगिक वसाहतींमध्ये डोंबिवलीचा क्रमांक १४ वा तर राज्यात दुसरा आहे. त्यामूळे सुसंस्कृतचे शहर किंवा अलिकडच्या काळात होत असलेली क्रिीडानगरी ही नवयी ओळख लोप पाऊन डोंबिवली हे प्रदूषणाने भरडलेले शहर असा त्याचा बदलौकिक होत आहे. विशेष म्हणजे शहरातील प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की, त्यामूळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
डोंबिवलीतील प्रदूषणाची सोशल मिडीयावर चर्चा