राजेश दाखिनकर यांची निवड

ठाणे (सीताराम विश्वकर्मा ): अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुखपदी राजेश दाखिनकर यांची निवड झाली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये रोजश दाखिनकर यांची समाजसेवा क्षेत्रात एक वेगळीच छाप आहे. शहरात कुठेही, कोणावरही, केव्हाही अत्याचार झाल्यास वेळेचे बंधन नं बाळगता रोजश दाखिलकर हे लोकांच्या मदतीसाठी धावून जातात. त्यांची समाजातील लोकांबरोबर असलेली बांधीलकी बघून अखिल भारतीय सेनेने त्यांच्यावर डोळेबंद करुन विश्वास ठेवला आहे. या विश्वासावर त्यांची ठाणे जिल्हा प्रमुख पदी अखिल भारतीय सेनेने निवड केली आहे.